उपमुख्यमंत्री आकड्यांचा खेळ करुन जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहे- आदित्य ठाकरे

 

मुंबई (वृत्तसंस्था) : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आकड्यांचा खेळ करुन जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी केला आहे. ते आज माध्यमांशी बोलत होते.

उपमुख्यमंत्री फडणवीस सांगत असलेले फॉक्सकॉन प्रकल्प हा दुसराच असल्याचं सांगत, २०२० मध्ये राज्याबाहेर गेलेला फॉक्सकॉन प्रकल्प हा मोबाईल कंपनीशी संबंधित होता आणि आता गेलेला प्रकल्प हा सेमिकंडक्टरशी संबंधित असून वेदांता फॉक्सकॉन आणि फॉक्सकॉन हे दोन्ही वेगवेगळे प्रकल्प असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.

मुख्यमंत्र्यांसोबत समोरासमोर चर्चा करण्यासाठी आपण तयार असल्याचं ठाकरे यावेळी म्हणाले. याबाबतीत मुख्यमंत्र्यांकडून उत्तर अपेक्षित होते असंही ते यावेळी म्हणाले.