आंतरराष्ट्रीय नियमांचं पालन आणि नौकानयनातली सुरक्षा याकरता कायदे करण्याप्रति भारत वचनबद्ध - राजनाथसिंग

 


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आंतरराष्ट्रीय नियमांचं पालन आणि नौकानयनातली सुरक्षा याकरता कायदे करण्याप्रति भारत वचनबद्ध असल्याचं संरक्षणमंत्री राजनाथसिंग यांनी आज सांगितलं. आशियातल्या १८ देशांच्या तटरक्षक दल प्रमुखांच्या बैठकीचं उद्घाटन करताना ते बोलत होते. सुरक्षित सागरी प्रवासाकरता संबंधित देशांमधे सहकार्य असणं गरजेचं आहे असं ते म्हणाले.