शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत येत्या दहा ऑक्टोबरपर्यंत वाढ

 


मुंबई (वृत्तसंस्था) : पत्राचाळ प्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांची न्यायालयीन कोठडी येत्या दहा ऑक्टोबरपर्यंत वाढण्यात आली आहे. राऊत यांचा जामीनासाठीचा अर्ज त्याच दिवशी सुनावणीला येईल, असं मुंबईच्या पीएमएलए विशेष न्यायालयानं सांगितलं. १ ऑगस्ट रोजी सक्तवसुली संचालनालयानं राऊत यांना मनीलाँड्रिंग प्रकरणी अटक केली होती.