जिल्हास्तरीय मल्लखांब स्पर्धाचे दिघी येथे आयोजन

 

भोसरी : नवजीवन स्पोर्ट्स फाऊंडेशन, दिघी व पुणे जिल्हा मल्लखांब संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने राघव मंगल कार्यालय दिघी येथे रविवार दिनांक ०२/१०/२०२२ रोजी (सकाळी ११.०० वा.) उदय चषक जिल्हास्तरीय मल्लखांब स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे. हा कार्यक्रम श्री. दत्तात्रय गायकवाड (मा. नगरसेवक), श्री.सचिन पुरोहित (अध्यक्ष पुणे जिल्हा मल्लखांब संघटना)व श्री. महादेव कसगावडे (जिल्हा क्रीडा अधिकारी) यांच्या प्रमुख उपस्थिती होणार आहे.

तसेच बक्षिस वितरण समारंभ त्याचं दिवशी दुपारी ०३.०० वाजता होणार आहे. याची सर्व क्रिडा रसिकांनी नोंद घ्यावी. वरील माहिती आयोजक श्री. उदय दत्तात्रय गायकवाड (नवजीवन स्पोर्ट्स फाऊंडेशन दिघी, पुणे जिल्हा मल्लखांब संघटना) यांनी दिली.