भारत ५ ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याच्या तयारीत - संरक्षण मंत्री

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेला नवीन उंचीवर नेण्यासाठी आवश्यक उपकरणांच्या मजबूत, सुरक्षित आणि जलद पुरवठ्यावर भर दिला आहे. ते आज नवी दिल्लीत भारतीय लष्कराच्या लॉजिस्टिक परिसंवादाला संबोधित करताना बोलत होते.

भारत 5 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याच्या तयारीत आहे. भविष्यात युद्ध आणि प्रशासकीय क्षेत्रासह विविध भागात उपकरणांचा पुरवठा सुरळीत राखणं महत्त्वाचं आहे असं ते म्हणाले. देशाला स्वावलंबी बनवण्यासाठी आणि कृतीशील पध्दतींमध्ये सुसूत्रीकरण आणण्यासाठी सरकारने अनेक महत्त्वाची धोरणे आखली आहेत असही त्यांनी सांगितलं.

Popular posts
एक्सपे.लाइफची मे महिन्यात डिजिटल पेमेंटद्वारे ६० हजार व्यवहारांची नोंद
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image