विश्व कुस्ती स्पर्धेत २ पदकं जिंकण्याचा विनेश फोगटचा विक्रम
• महेश आनंदा लोंढे
नवी दिल्ली(वृत्तसंस्था) : सर्बियामधील बेलग्रेड इथं झालेल्या जागतिक कुस्ती स्पर्धेत भारतीय महिला कुस्ती खेळाडू विनेश फोगाट हिनं, ५३ किलो वजनी गटात कांस्यपदक जिंकलं आहे. या स्पर्धेत दोन पदक मिळवणारी विनेश, पहिली भारतीय महिला कुस्तीपटू ठरली आहे. तिनं विद्यमान युरोपियन स्पर्धा विजेती एमा माल्म्ग्रेन हिचा ८ – ० या फरकाने पराभव करून हे पदक पटकावलं. याआधी विनेशला पात्रता फेरीत पराभव पत्करावा लागला होता.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.