रुग्णालयांमध्ये स्वच्छतेला महत्त्व देऊन रुग्णांना चांगली सेवा देण्याचा प्रयत्न करण्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचे निर्देश

 

मुंबई (वृत्तसंस्था) : रुग्णालयांमध्ये स्वच्छतेला महत्त्व देऊन रुग्णांना चांगली सेवा देण्याचा प्रयत्न करण्याचे निर्देश आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी काल सोलापूर जिल्ह्यात नातेपुते इथं दिले. सावंत यांनी काल नातेपुते आणि माळशिरस इथल्या ग्रामीण रुग्णालयाला भेट देऊन पाहणी केली.

कोविडचा प्रादुर्भाव कमी वाटत असला तरी अजून कोरोना पूर्णपणे संपलेला नाही. त्यामुळे कोरोना प्रतिबंधक लसीकरण करून घेण्यासाठी नागरिकांचं समुपदेशन करण्याच्या सूचना त्यांनी केल्या.