बारामतीतले नागरिक कायम शरद पवार यांच्यासोबत राहतील, जयंत पाटील यांचा विश्वास

 

मुंबई (वृत्तसंस्था) : भाजपानं प्रचाराचं कुठलंही तंत्र अवलंबलं तरी बारामतीतले नागरिक कायम शरद पवार यांच्यासोबत राहतील, असा विश्वास राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे. ते आज सांगली जिल्ह्यातल्या इस्लामपूर इथं बोलत होते.

शिवसेनेच्या दोन गटांमधील वादाबाबत न्यायालयात दररोज सुनावणी झाली तर चित्र लवकर स्पष्ट होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा पाटील यांनी व्यक्त केली.