उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला ऊर्जा विभागाचा आढावा

 

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातल्या शेतकऱ्यांना दोन लाख सौर कृषिपंप पुरवणं, मार्च २०२२ पर्यंतच्या सर्व शेतीपंप जोडण्याचा अनुशेष पूर्ण करणं आणि कृषिफिडर सौर उर्जेवर आणणं आदी म्हत्त्वपूर्ण निर्णय आज झालेल्या ऊर्जा विभागाच्या आढावा बैठकीत घेण्यात आले.

वांद्रे इथल्या प्रकाशगड कार्यालयात महाऊर्जा नियामक मंडळाची बैठक आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांच्या अध्यक्षतेखाली झाली, त्या बैठकीत हे निर्णय घेण्यात आले. महानिर्मिती कंपनीत वीजनिर्मितीचा खर्च कमी करण्याचा प्रयत्न येत्या काळात करण्यात येणार असून त्यासाठीच्या सर्व प्रकल्पांचा भविष्यातला संपूर्ण रोडमॅप निश्चित करण्यासंदर्भातल्या सूचना फडणवीस यांनी या बैठकीत दिल्या.