सप्तश्रृगी देवीचं मंदीर घटस्थापनेपासून भाविकांसाठी पुन्हा खुलं होणार

 

मुंबई (वृत्तसंस्था) : नाशिक जिल्ह्यातल्या वणी इथल्या श्री सप्तशृंगी देवीचं मंदिर २६ सप्टेंबर अर्थात घटस्थापनेपासून पासून खुलं करण्यात येणार आहे. मंदिराच्या दुरुस्तीसाठी हे मंदिर गेल्या महिनाभरापासून बंद ठेवण्यात आलं होतं. दुरुस्तीचं काम पूर्ण झाले असून हे मंदिर खुले होणार असल्याची माहिती विश्वस्त ललित निकम यांनी दिली.