भारत आणि बांग्लादेश दरम्यान विविध क्षेत्रात ७ द्विपक्षीय करार

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि बांगलादेशाच्या प्रधानमंत्री शेख हसीना यांनी ‘मैत्री सुपर-औष्णिक ऊर्जा प्रकल्पाच्या पहिल्या संघाचं आज संयुक्तरित्या उद्घाटन केलं. या प्रकल्पाच्या उभारणीसाठी भारतानं सवलतीच्या दरात अर्थसहाय्य केलं असून त्यामुळे बांगलादेशाच्या राष्ट्रीय ग्रीडमध्ये १ हजार ३२० मेगावॅट ऊर्जेची भर पडणार आहे.

भारत-बांगलादेशादरम्यान आज झालेल्या द्विपक्षीय चर्चेत ऊर्जा, जलस्रोत,व्यापार आणि गुंतवणूक, सीमा व्यवस्थापन आणि सुरक्षा, विकास प्रकल्प तसंच क्षेत्रीय आणि बहूउद्देशीय विषयांचा प्राधान्यानं समावेश होता. या चर्चेनंतर दोन्ही देशांमध्ये रेल्वे,जलस्रोत, विज्ञान तंत्रज्ञान, अंतराळ तंत्रज्ञान अशा विषयात सात करार झाले. प्रसार भारती आणि बांगलादेश टेलिव्हिजन यांच्यात प्रसारणासंबंधित समझौता करारही करण्यात आला आहे.