स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म्सनी भारतीय संस्कृती आणि ज्ञान परंपरा जगासमोर आणावी – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार

 

मुंबई : स्ट्रीमिंग प्रसारण प्लॅटफॉर्म्सनी भारतीय संस्कृती आणि ज्ञान परंपरा जगासमोर आणावी. तसेच या माध्यमाचा उपयोग मनुष्य जीवनात चांगले परिवर्तन घडविण्यासाठी करावा, असे प्रतिपादन सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज केले. मुंबईत आयस्ट्रीम काँगेस 22 या परिषदेचे उद्घाटन करताना ते बोलत होते.

श्री.मुनगंटीवार म्हणाले की, हे माध्यम दुधारी आहे. त्याचा सकारात्मक उपयोग करायचा की नकारात्मक हे आपल्या हातात आहे. त्यामुळे स्ट्रीमिंग उद्योगाने देश उभारणीत आपला वाटा सकारात्मक पद्धतीने उचलावा. आज प्रत्येकाच्या हातात भ्रमणध्वनी असतो, त्यामुळे या उद्योगाचा प्रत्येकाच्या जीवनावर थेट प्रभाव पडतो. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने मनोरंजन कर कमी करत या उद्योगाला मदत केली. महाराष्ट्र शासन म्हणून आम्ही ठामपणे या उद्योगाच्या पाठी उभे आहोत.

श्री.मुनगंटीवार यांनी पुढे सांगितले की, आज अमेरिकेत लाखो विद्यार्थी संस्कृत शिकत आहेत, तर जर्मनीमधल्या विद्यापीठांमध्ये भारतशास्त्र (इंडॉलॉजी) अभ्यासक्रमांना प्रचंड मागणी आहे. जगभरात भारताचे आकर्षण वाढले आहे. अशावेळी स्ट्रीमिंग उद्योगाने भारतीय संस्कृती व ज्ञान परंपरा जगासमोर चांगल्या पद्धतीने मांडण्याची गरज आहे.

Popular posts
विधानभवनाच्या प्रवेशद्वारावरच्या पायऱ्यांवर आंदोलन करायला, आणि प्रसारमाध्यमांनी तिथे चित्रीकरण करायला बंदी घालावी - जयंत पाटील
Image
देशव्यापी लसीकरण मोहिमेत आतापर्यंत कोविड प्रतिबंधक लशींच्या 122 कोटींचा टप्पा ओंलाडला
Image
महाराष्ट्र वस्तू आणि सेवा कर सुधारणा विधेयकाला विधानसभेत मंजुरी
Image
राज्यात आतापर्यंत ६४ लाख ५६ हजार ९३९ जणांना कोरोनाची लागण
Image
शेतकऱ्यांच्या जीवनात बदल घडवून आणण्यासाठी कृषी व्यवस्थापन अभ्यासक्रमाच्या पदवीधरांनी काम करावं- केंद्रीय कृषीमंत्री
Image