दाऊद इब्राहिमची माहिती देणाऱ्यांना एनआयएचं २५ लाखांचं बक्षीस

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय तपास यंत्रणेनं कुख्यात गुन्हेगार दाऊद इब्राहिमवर २५ लाख रुपयांचं बक्षीस लावलं आहे. दाऊदचा  हस्तक छोटा शकील वरही एनआयएनं २० लाख रुपयांचं बक्षीस लावलं आहे. त्यांच्या आणखी ३ हस्तकांवर प्रत्येकी १५ लाख रुपयांचं बक्षीस लावण्यात आलं असल्याचं एनआयएनं सांगितलं आहे.

दाऊद इब्राहिम आणि त्याचे हस्तक आंतरराष्ट्रीय स्तरावर दहशतवादी कारवायांमधे सहभागी होत असून लष्कर-ए- तय्यबा, अल कायदा आणि जैश ए मोहम्मद या संघटनांसाठी काम करत आहेत. या गुन्हेगारांविषयी माहिती देणाऱ्यांना हे बक्षीस देण्याचं एनआयएनं जाहीर केलं आहे.