अवयव दाना बाबतचे भ्रम दूर करुन जागरुकता वाढवण्यासाठी प्रयत्न करण्याचं उपराष्ट्रपतीचं आवाहन

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अवयव दाना बाबतचे भ्रम दूर करुन जागरुकता वाढवण्यासाठी आणि अवयव दानासाठी धर्मगुरू आणि माध्यमांनी पुढाकार घ्यायला हवा असं आवाहन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी केलं आहे. अवयव दानासाठी दिल्लीत आज राष्ट्रीय मोहीमेचा शुभारंभ त्यांच्या हस्ते करण्यात आला, त्यावेळी धनखड बोलत होते. दधिची देहदान समितीनं हा कार्यक्रम आयोजित केला होता. दरम्यान, अवयव दान ही मोहीम यशस्वी होण्यासाठी ती लोकचळवळ झाली पाहिजे, असं केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉक्टर मनसुख मांडविया यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत ‘स्वस्थ सबल भारत’ परिषदेचं डिजिटल पद्धतीनं उद्घाटन केल्यानंतर आज ते बोलत होते.