राज्य सरकार पोलिसांची वीस हजार पदं भरणार

 

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य सरकार पोलिसांची वीस हजार पदं भरणार आहे, त्यापैकी सात हजार पदांची भरती प्रक्रिया आधीच सुरु झाली आहे, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी गृह आणि वित्तविभागाच्या आढावा बैठकीनंतर वार्ताहरांशी बोलताना सांगितलं. या बैठकीत अनेक बाबींचा आढावा घेतल्याचं त्यांनी सांगितलं. या बैठकीत राज्याच्या आर्थिक स्थितीचा तसंच सायबर सुरक्षेचाही आढावा घेतला गेला. आर्थिक कारणांमुळे जामिन मिळत नसलेल्यांना कायदेशीर मदत करण्यासारख्या कारागृहाशी संबधित सुधारणा राज्य सरकारच्या विचाराधीन आहेत, असंही ते म्हणाले. इतर राज्यांमधले उत्तम उपक्रम आणि योजनांची माहिती घेऊन उत्तमोत्तम योजना राज्यात राबवू, अशी ग्वाही त्यांनी दिली.