सर्वसामान्य जनतेच्या अपेक्षा राज्य सरकार पूर्ण करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 

औरंगाबाद : राज्यातील सरकार सर्वसामान्य जनतेचे असून त्यांच्या  अपेक्षा पूर्ण करण्याचे काम या सरकारकडून निष्ठेने केले जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपेगाव (ता.पैठण) येथे दिली.

श्री संत ज्ञानेश्वर माऊली यांची जन्मभूमी असलेल्या श्रीक्षेत्र आपेगाव येथील माऊलींच्या मंदिरात जाऊन मुख्यमंत्र्यांनी दर्शन घेतले. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

श्री संत ज्ञानेश्वर माऊलींच्या जन्मभूमीच्या दर्शनाने आपण भारावलो असून सर्वसामान्यांची सेवा करण्याची शक्ती माऊली निश्चितपणे देतील, अशी भावनाही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी व्यक्त केली. दर्शनानंतर विश्वस्त मंडळातर्फे मुख्यमंत्र्यांचा शाल, श्रीफळ, श्री संत ज्ञानेश्वर माऊलींची मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी संस्थानचे अध्यक्ष ज्ञानेश्वर विष्णू महाराज कोल्हापूरकर, रोहयो मंत्री संदिपान भुमरे, आमदार संजय शिरसाट, आमदार प्रदीप जैस्वाल,  जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, पोलीस महानिरीक्षक के. एम. मल्लिकार्जुन प्रसन्ना आदी उपस्थित होते.