नवरात्रीनिमित्त राज्याच्या आरोग्य विभागाकडून मातांसाठी विशेष आरोग्य मोहिम सुरु

 

मुंबई (वृत्तसंस्था) : नवरात्रीनिमित्त राज्याच्या आरोग्य विभागाने उपजिल्हा रुग्णालयात महिला आणि गरोदर मातांसाठी विशेष आरोग्य मोहिम सुरु केली आहे. महिलांचे आजार, लसीकरण, नेत्रतपासणी तसंच कर्करोग तपासणी अश्या विविध तपासण्या उपचार आणि आरोग्यासाठी योग्य मार्गदर्शन याचा या मोहिमेत अंतर्भाव आहे.

२६ सप्टेंबर पासून सुरू झालेली ही मोहिम ५ ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार आहे. याला ग्रामीण भागातल्या महिलांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. पंढरपूरच्या उपजिल्हा रुग्णालयात या अभियानामध्ये आतपर्यत ४०० महिला रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे.