भारताची औषधं आणि आवश्यक उपकरणं असलेली मदतीची १२वी खेप युक्रेनला सुपूर्द

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतानं मानवतावादी भूमिकेतून औषधं आणि आवश्यक उपकरणं असलेली मदतीची १२वी खेप युक्रेनला सुपूर्द केली. रशियासोबतच्या संघर्षात युक्रेनला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असून या अडचणी कमी करण्यासाठी यूक्रेनला ही मदत करण्यात आली आहे. युक्रेनमधले भारताचे राजदूत हर्ष कुमार जैन यांनी युक्रेनचे उप आरोग्य मंत्री ओलेक्सी इरेमेन्को यांना ही मदत सुपूर्द केल्याचं कीव्ह मधल्या भारतीय दूतावासानं एका ट्विटमध्ये म्हटलं आहे. भारतानं यापूर्वी १ मार्चला पोलंडमार्गे युक्रेनला औषधं आणि इतर मदत सामग्रीसोबत मदतीची पहिली खेप पाठवली होती.