राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार २०२२ साठी अर्ज स्वीकारण्याची मुदत १ ऑक्टोबर पर्यंत वाढवली

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार २०२२ साठी अर्ज स्वीकारण्याची मुदत यावर्षी १ ऑक्टोबर पर्यंत वाढवण्यात आली आहे. या आधीची २७ सप्टेंबरपर्यंत अर्ज पाठवण्याची मुदत होती. युवक कल्याण आणि क्रीडा मंत्रालयानं मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार, अर्जुन पुरस्कार, द्रोणाचार्य पुरस्कार, ध्यानचंद पुरस्कार, राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार आणि मौलाना अबूल कलाम आझाद ट्रॉफीसाठी राष्ट्रीय पुरस्कारांसाठी अर्ज मागवले आहेत. dbtyas-sports.gov.in. या पोर्टलचा वापर करून खेळाडूंना स्वतःहून ऑनलाइन अर्ज करता येतील.