पहलगाममध्ये ITBP ची बस दरीत कोसळून झालेल्या अपघातात ६ जवानांचा मृत्यू

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू-काश्मिरातल्या पहलगाममध्ये झालेल्या बसला झालेल्या अपघातात ITBP अर्थात इंडो-तिबेटियन बॉर्डर पोलिसातल्या ६ जणांचा मृत्यू झाला आणि इतर ३० जण जखमी झाले. जखमींना हवाईदलाच्या मदतीनं श्रीनगरमधल्या लष्कराच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या बस ITBP चे ३७ आणि जम्मू काश्मिर पोलिसांचे २ जवान होते. ब्रेक निकामी झाल्यानं ही बस दरीत कोसळली.