भारतानं अफगाणिस्तानला आतापर्यंत एकंदर ४० हजार मेट्रिक टन गहू पाठवला

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतानं अफगाणिस्तानला आतापर्यंत एकंदर ४० हजार मेट्रिक टन गहू पाठवला आहे. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या अफगाणिस्तानसंदर्भातील बैठकीत संयुक्त राष्ट्र संघातल्या भारताच्या स्थायी प्रतिनिधी रुचिरा कंबोज यांनी ही माहिती दिली.

भारतानं अफगाणिस्तानाला मानवतावादी दृष्टीकोनातून ३२ टन  वैद्यकीय साह्यासह इतर स्वरुपाचीही मदत पोहोचवली असल्याचं कंबोज यांनी नमूद केलं. अफगाणिस्तानमध्ये मदत म्हणून पाठवलेल्या गव्हाचं न्याय्य आणि योग्य पद्धतीनं वितरण व्हावं यासाठी,भारतानं संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक अन्न कार्यक्रमाशी करार केला आहे. तसंच गहू वितरणावर देखरेख आणि समन्वय यासाठी काबूलमधल्या भारतीय दूतावासात एक विशेष पथक देखील तैनात करण्यात आलं असल्याचंही त्यांनी सांगितलं.

आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनांना अफगाणिस्तानमधे स्थानिकांचा पाठिंबा नसतानाही त्यांच्या कारवाया वाढत असल्याचं दिसतं आणि ही बाब चिंताजनक आहे असं नमूद करताना कंबोज यांनी अलिकडेच काबूलमधे गुरुद्वारावर हल्ला झाल्याचा उल्लेख केला. 

Popular posts
विधानभवनाच्या प्रवेशद्वारावरच्या पायऱ्यांवर आंदोलन करायला, आणि प्रसारमाध्यमांनी तिथे चित्रीकरण करायला बंदी घालावी - जयंत पाटील
Image
महाराष्ट्र वस्तू आणि सेवा कर सुधारणा विधेयकाला विधानसभेत मंजुरी
Image
शेतकऱ्यांच्या जीवनात बदल घडवून आणण्यासाठी कृषी व्यवस्थापन अभ्यासक्रमाच्या पदवीधरांनी काम करावं- केंद्रीय कृषीमंत्री
Image
देशव्यापी लसीकरण मोहिमेत आतापर्यंत कोविड प्रतिबंधक लशींच्या 122 कोटींचा टप्पा ओंलाडला
Image
राज्यात आतापर्यंत ६४ लाख ५६ हजार ९३९ जणांना कोरोनाची लागण
Image