तैवान जवळच्या परिसरातला चीनचा युद्धसराव हेबेजबाबदारपणाचं कृत्य असल्याचं अमेरिकेच्या प्रवक्त्यांचं मत

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : तैवान जवळच्या परिसरातला चीनचा युद्धसराव हे बेजबाबदारपणाचं कृत्य असल्याचं अमेरिकेनं म्हटलं आहे. चीनच्या या कारवायांना अमेरिका  तणाव वाढवण्याचा प्रयत्न समजत असल्याचं अमेरिकेतल्या एका वृत्त पत्रानं व्हाईट हाऊसच्या सूत्रांचा संदर्भ देऊन म्हटलं  आहे.

अमेरिकेच्या प्रवक्ता नॅन्सी पेलोसी यांच्या तैवान दौऱ्यानंतर चीननं  तैवान जवळच्या परिसरात  युद्ध सराव सुरु केला आहे. चीनचं हे कृत्य चिथावणी देणारं असून त्यामुळे तणाव वाढण्याचा  आणि तैवानमधली शांतता आणि स्थैर्याला बाधा पोहोचण्याचा धोका आहे असं व्हाईट हाऊस च्या प्रवक्त्यानं म्हटलं आहे.