अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा मुद्यांवर मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या उत्तरावर असमाधानी असलेल्या विरोधी पक्षाचा सभात्याग

 

मुंबई (वृत्तसंस्था) : अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा मुद्यांवर मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या उत्तरावर असमाधानी असलेल्या विरोधी पक्षानं सभात्याग केला. त्यापूर्वी बोलताना विधानसभेतले विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले, सरकारनं ओला दुष्काळ जाहीर केलेला नाही. शेतमजुरांना एकरकमी मदत जाहीर केलेली नाही. अतिवृष्टीग्रस्त भागातल विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क माफी करावी, आदिवासींना खावटी अनुदान द्यावं, अशी मागणी त्यांनी पुन्हा केली. शेतकऱ्यांना अधिक मदत मिळावी या मागणीचा पुनरुच्चार त्यांनी केला.

यावर बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, गोगलगायीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई देण्याची तरतूद NDRF च्या निकषात नसताना मदतीची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. आदिवासींना खावटी अनुदान देणार असल्याचंही ते म्हणाले.