शिवसेनेच्या दसरा मेळाव्याबाबत कोणताही संभ्रम नाही- उद्धव ठाकरे

 

मुंबई (वृत्तसंस्था) : शिवसेनेच्या दसरा मेळाव्याबाबत काहीही संभ्रम नसून, हा मेळावा आमचाच होणार, असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. ते काल मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. राज्यभरातल्या शिवसैनिकांनी शिवतीर्थावर मेळाव्याला येण्याची तयारी सुरू केली असल्याचं ते म्हणाले.

दरम्यान, बजरंग दलाचे उद्धव कदम आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी काल शिवसेनेत प्रवेश केला. त्याचबरोबर काँग्रेसचे माजी आमदार डॉ. संतोष टारफे आणि शेतकरी नेते अजित मगर यांनी देखील आपल्या समर्थकांसह शिवसेनेत प्रवेश केला. मुंबईत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवबंधन बांधून त्यांचं पक्षात स्वागत केलं.