बिहारमध्ये राष्ट्रीय जनता दलाच्या ३१ जणांनी घेतली मंत्रीपदाची शपथ

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बिहारमधे नीतीशकुमार यांच्या नेतृत्वाखालच्या महा आघाडीच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी झाला. राज्यपाल फागू चौहान यांनी ३१ मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.  राष्ट्रीय जनता दलाचे १६ तर संयुक्त जनता दलाचे ११ मंत्री  त्यात आहेत. लालू प्रसाद यादव यांचे चिरंजीव तेज प्रताप यादव यांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली.

काँग्रेसला २ तर  जीतनराम मांझी यांच्या हिंदुस्तानी अवाम मोर्चाला एक मंत्रिपद मिळालं असून एका अपक्षाचाही समावेश आहे. डाव्यापक्षांचे १६ आमदार असून त्यांनी मंत्रिमंडळाबाहेर रहाण्याचा निर्णय घेतला आहे.