जन्मभूमीतील सत्कार माझ्यासाठी प्रेरणादायी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 

सातारा :  ‘मुख्यमंत्री पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर अनेक जिल्ह्यांना भेटी दिल्या. यावेळी विविध मान्यवरांकडून माझा सत्कार करण्यात आला. पण, माझ्या जन्मभूमीत झालेला माझा सत्कार ही आनंदाची बाब असून जनतेच्या हिताचे निर्णय घेताना प्रेरणादायी ठरेल’ असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

तापोळा ता. महाबळेश्वर येथे तापोळा ग्रामस्थांच्या वतीने मुख्यमंत्री श्री. शिंदे यांचा सहकुटुंब नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री  बोलत होते. याप्रसंगी खासदार श्रीकांत शिंदे, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलीस अधीक्षक अजयकुमार बंसल यांच्यासह तापोळा गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राज्य शासनाने शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले आहेत. अतिवृष्टीमुळे तीन  हेक्टरपर्यंत झालेल्या पिकांची नुकसान भरपाई दुपटीने देण्यात येणार आहे. राज्याचा सर्वांगीण  विकास करण्याचा प्रयत्न राहणार असून राज्यात मोठे उद्योग उभारण्यावर भर देण्यात येणार आहे. महाबळेश्वर-तापोळा रस्त्यासह पश्चिम महाराष्ट्र कोकणाला कसा जोडला जाईल, यासाठी दळणवळण यंत्रणा अधिक सक्षम केली जाईल, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

Popular posts
एक्सपे.लाइफची मे महिन्यात डिजिटल पेमेंटद्वारे ६० हजार व्यवहारांची नोंद
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image