मराठा समाजाला आरक्षण देण्यासह इतर अन्य मागण्यांच्या संदर्भात काल बैठकीचं आयोजन

 

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य शासनाच्या विविध विभागांमार्फत विविध पदांसाठी घेण्यात आलेल्या परीक्षांमध्ये मराठा आरक्षणाद्वारे निवड झालेल्या १ हजार ६४ उमेदवारांना तात्काळ नियुक्ती देण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल सांगितलं.

मराठा आरक्षण आणि अन्य मागण्यांसदर्भात मुंबईत झालेल्या बैठकीत ते बोलत होते. सुमारे एकवीसशे उमेदवार मराठा आरक्षणाची सुविधा घेऊन शासकीय सेवेत रुजू होणार आहेत. यापैकी ४१९ उमेदवार आतापर्यंत शासन सेवेत रुजू झाले आहेत, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

मराठा समाजासाठीच्या सारथी संस्थेला निधी कमी पडू दिला जाणार नाही अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या बैठकीत दिली. सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाबाबतची स्थिती सक्षमपणे मांडण्यासाठी हे शासन प्रयत्न करेल, असं महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितलं. 

Popular posts
कोल्हापुरातल्या गावित भगिनींच्या फाशीच्या शिक्षेचं जन्मठेपेत रुपांतर करण्याचा मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
भ्रष्टाचार निर्मूलन आणि पारदर्शक प्रशासन याकरता सरकार वचनबद्ध असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image
मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी ‘स्वीप’ उपक्रमांवर भर द्यावा - जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे
Image