मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची राहुल शेवाळे यांची मागणी

 

मुंबई (वृत्तसंस्था) : मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची मागणी खासदार राहुल शेवाळे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे केली आहे. याबाबतचं लेखी पत्र त्यांनी काल शहा यांच्याकडे सादर केलं. यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, कृपाल तुमाने, सदाशिव लोखंडे, संजय मंडलिक आणि राजेंद्र गावित उपस्थित होते.

शेवाळे यांनी २०१५ मध्ये मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याविषयी लोकसभेत मागणी केली होती, तेव्हापासून ते सातत्यानं या विषयाचा पाठपुरावा करत आहेत.