जालन्यातल्या विविध व्यावसायिक आस्थापनांवर आयकर विभागाची छापेमारी

 

मुंबई (वृत्तसंस्था) : जालना इथल्या स्टील व्यावसायिकांच्या कारखान्यांवर, घरांवर तसचं कार्यालयांवर प्राप्तीकर विभागानं टाकलेल्या छाप्यांत सुमारे ३९० कोटींची बेहिशेबी मालमत्ता उघडकीला आली आहे. प्राप्तीकर विभागानं जालना इथल्या दोन व्यावसायिकांच्या, जालना, औरंगाबाद, नाशिक आणि मुंबईतल्या मिळून ३० ठिकाणी नुकतीच ही कारवाई केली. या व्यावसायिकांनी आवश्यकतेपेक्षा जास्त आणि कागदोपत्री न दाखवता मोठ्या प्रमाणात कच्च्या मालाचा साठा केला होता. त्याचप्रमाणे अनेक बेहिशेबी व्यवहार करुन जीएसटीही चोरी केल्याचं प्राप्तिकर खात्याला आढळून आलं होतं.

Popular posts
विधानभवनाच्या प्रवेशद्वारावरच्या पायऱ्यांवर आंदोलन करायला, आणि प्रसारमाध्यमांनी तिथे चित्रीकरण करायला बंदी घालावी - जयंत पाटील
Image
देशव्यापी लसीकरण मोहिमेत आतापर्यंत कोविड प्रतिबंधक लशींच्या 122 कोटींचा टप्पा ओंलाडला
Image
महाराष्ट्र वस्तू आणि सेवा कर सुधारणा विधेयकाला विधानसभेत मंजुरी
Image
राज्यात आतापर्यंत ६४ लाख ५६ हजार ९३९ जणांना कोरोनाची लागण
Image
शेतकऱ्यांच्या जीवनात बदल घडवून आणण्यासाठी कृषी व्यवस्थापन अभ्यासक्रमाच्या पदवीधरांनी काम करावं- केंद्रीय कृषीमंत्री
Image