सरकारी तपास यंत्रणांनी बजावलेल्या समन्सला संसद सदस्य टाळू शकत नाहीत- सभापती एम. व्यंकय्या नायडू

 



नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संसदेच्या अधिवेशन काळात किंवा इतर दिवशी सरकारी तपास यंत्रणांनी बजावलेल्या समन्सला संसद सदस्य टाळू शकत नाहीत असं राज्यसभेचे सभापती एम. व्यंकय्या नायडू यांनी राज्यसभेत सांगितलं.

संसद सदस्य कोणतेही कारण देऊन तपास यंत्रणेकडून केली जाणारी अटक, कोठडी किंवा चौकशी टाळू शकत नाही असं त्यांनी स्पष्ट केलं. विरोधी पक्ष नेते मल्लिकार्जुन खडगे यांनी अधिवेशन काळात त्यांना ईडीनं चौकशीसाठी बोलावल्याच्या आरोपावर टिप्पणी करताना सभापती बोलत होते.

सर्वोच्च न्यायालय आणि राज्यसभेच्या निर्देशित नियमांचा हवाला देत तपास संस्थांकडून केल्या जाणाऱ्या चौकशी संदर्भात सामान्य नागरिक आणि संसद सदस्यांना समान नियम लागू  होतात असं नायडू यांनी अधोरेखित केलं.

राज्य सभेत आज आरोग्य अधिकार २०२१ या विधयेकावर चर्चा सुरु झाली. सर्व नागरिकांना आरोग्य सुविधा मूलभूत अधिकाराच्या रूपात प्रदान करणे हा या विधेयकाचा मुख्य उद्देश आहे.