१८ ऑगस्ट रोजी श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या वतीने राष्ट्रीय गणेशोत्सव २०१९ स्पर्धेचा रोख पारितोषिक वितरण समारंभ - महेशभाऊ सूर्यवंशी
• महेश आनंदा लोंढे
पिंपरी : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट पुणे यांच्या वतीने राष्ट्रीय गणेशोत्सव २०१९ स्पर्धेचे बक्षीस वितरण १८ ऑगस्ट २०२२ रोजी आचार्य अत्रे रंगमंदिर येथे सायंकाळी सहा वाजता करण्यात येणार असल्याची माहिती ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेशभाऊ सूर्यवंशी यांनी दिली. निगडी येथील सावली हॉटेल या ठिकाणी पत्रकार परिषद आयोजित केली होती, यावेळेस ते बोलत होते.
या वेळी सूर्यवंशी म्हणाले की, दरवर्षी श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट पुणे यांच्या वतीने राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धेचे आयोजन केले जाते. पिंपरी चिंचवड शहर महानगपालिका क्षेत्रात २९ वर्षापासून स्पर्धा आयोजित केली जाते. गेली दोन वर्षे झाले कोरोनाचे संकट असल्यामुळे २०१९ पासून स्पर्धेचे वितरण बाकी होते. त्याचे वितरण विधानसभेचे विद्यमान विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांच्या हस्ते केले जाणार आहे. गणेश उत्सवाच्या व्यासपीठाचा उपयोग मंडळे समाजाच्या हिता करता कशा पद्धतीने करतात यावर बक्षिसाचे वितरण ठरवले जाते. यामध्ये शैक्षणिक, आरोग्य, पर्यावरण, जनजागृती किंवा प्रबोधनाच्या उपक्रम व कार्यक्रमाच्या अनुषंगाने हे बक्षीस दिल्या जातात. जवळपास १३ लाखाचे रोख बक्षिसे वितरित केले जाणार आहेत.
२०१९ ला १२९ मंडळांनी सहभाग घेतला होता. त्यामध्ये १०९ मंडळांनी बक्षिसे मिळवली आहेत. त्यांना बक्षीसे वितरीत केली जाणार आहेत. शहरात प्रथम येणाऱ्या पाच मंडळांना बक्षीसे दिली जातात. या व्यतिरिक्त प्रत्येक प्रभागात सुद्धा बक्षिसे दिली जातात. प्रथम येणाऱ्या मंडळांना सन्मानाने निवृत्त करून त्या जागी नवीन मंडळांच्या कला गुणांना वाव मिळावा या प्रकारची रचना केलेली असते. या कार्यक्रमाला शहरातील महापौर, पोलीस आयुक्त, सर्व आमदार, नगरसेवक यांना आमंत्रित केले असून हे सर्व उपस्थित राहणार आहेत.
या वेळी उत्सव प्रमुख हेमंत रासने, उपाध्यक्ष सुनील रासने, विश्वस्त अमोल केदारी, सरचिटणीस माणिकराव चव्हाण, सिनेट सदस्य पुणे विद्यापीठ संतोष ढोरे, समन्वयक बापूसाहेब ढमाले, समन्वयक अनिल वाघेरे व दिलीप माळी इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.