क्रीडा दिनानिमित्त क्रीडा मंत्री यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रमांचे आयोजन
• महेश आनंदा लोंढे
मुंबई : हॉकी खेळातील जादूगर म्हणून नावाजलेले मेजर ध्यानचंद यांचा 29 ऑगस्ट हा जन्मदिन सर्व देशभर राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्ताने क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीष महाजन यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
जिल्हा क्रीडा अधिकारी, मुंबई शहर यांच्या कार्यालयाच्यावतीने क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीष महाजन यांच्या शुभहस्ते मुंबई हॉकी स्टेडियम, चर्चगेट येथे सकाळी 9 वा. मेजर ध्यानचंद यांचे प्रतिमेस वंदन करुन राष्ट्रीय क्रीडा दिनाची सुरुवात होणार आहे. त्यानंतर डॉन बॉस्को स्कूल, माटुंगा येथे सकाळी 10 वा. क्रीडा मंत्री यांच्या हस्ते मुंबई शहरातील नावाजलेले खेळाडू व मार्गदर्शक यांचा सत्कार होणार आहे. तसेच कबड्डी, फुटबॉल व हॉकी खेळांचे सामने सुरु होणार आहेत. या कार्यक्रमाकरीता शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे सचिव, मुंबई विभागाचे क्रीडा युवक सेवा उपसंचालक यांची उपस्थिती असणार आहे.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.