राज्यांच्या पोलीस महासंचालकांना जनसांख्यिकीय बदलांवर बारकाईनं लक्ष ठेवण्याच्या सूचना

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी इतर देशांच्या सीमेलगत असलेल्या राज्यांच्या पोलीस महासंचालकांना सीमावर्ती भागात होत असलेल्या जनसांख्यिकीय बदलांवर बारकाईनं लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत.

नवी दिल्ली इथं  गुरुवारी राष्ट्रीय सुरक्षा धोरणासंदर्भातील दोन दिवसीय परिषदेच्या समारोप सत्रात बोलताना शाह यांनी हे आवाहन केलं. तुमच्या राज्यांमधील, विशेषत: सीमावर्ती जिल्ह्यांमधील सर्व तांत्रिक आणि धोरणात्मक बाबींची खडान् खडा माहिती असणं ही पोलीस महासंसंचालकांची जबाबदारी आहे. असं ते म्हणाले.