गणेशोत्सवात ध्वनिक्षेपक वापरासाठी ५ दिवस परवानगी

 

पुणे : सार्वजनिक गणेश मंडळाला ध्वनी प्रदुषण संबंधी नियमांचे पालन करुन गणेशोत्सवादरम्यान चार ऐवजी ५ दिवस सकाळी ६ वाजल्यापासून ते रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धकाचा वापर करण्यास परवानगी देण्याबाबतचा आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी निर्गमित केला आहे.

पुण्यातील सार्वजनिक गणपतींचे देखावे व आरास पाहण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करीत असल्याने ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धक वापरास ४ ऐवजी ५ दिवस परवानगी देण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुणे दौऱ्यादरम्यान दिल्या होत्या. त्यानुसार पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक आणि प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन हा निर्णय घेण्यात आला.

ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धक वापराच्या निर्बंधास सुट दिलेल्या गणेशोत्सवाखेरीज इतर सण, उत्सव तसेच ठेवून जिल्ह्यातील गणेशोत्सवासाठी शनिवार, ३ सप्टेंबर, रविवार, ४ सप्टेंबर, मंगळवार ६ सप्टेंबर, बुधवार ७ सप्टेंबर आणि शुक्रवार, ९ सप्टेंबर २०२२ या कालावधीत एकूण ५ दिवस नियमांचे पालन करून ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धकाचा रात्री १२ वाजेपर्यंत वापर करण्यास परवानगी देण्यात येत असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Popular posts
एक्सपे.लाइफची मे महिन्यात डिजिटल पेमेंटद्वारे ६० हजार व्यवहारांची नोंद
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image