जॉर्जिया इथं आंतरराष्ट्रीय खगोल शास्त्र आणि खगोल भौतिक ऑलिम्पियाडमध्ये भारताची ३ सुवर्ण आणि २ रौप्य पदकांची कमाई

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जॉर्जिया इथं १५ ते २२ ऑगस्ट या काळात झालेल्या आंतरराष्ट्रीय खगोल शास्त्र आणि खगोल भौतिक ऑलिम्पियाडमध्ये भारताच्या संघानं ३ सुवर्ण आणि २ रौप्य पदकं पटकावली आहेत. भारतीय संघातल्या प्रत्येक सदस्यानं  या स्पर्धेत  कमीतकमी एक पदक मिळवलं आहे. चंदीगडचा राघव गोयल, कोलकाता इथला मोहम्मद अख्तर आणि हैदराबादचा मेहुल बोराड यांनी सुवर्ण पदक तर गाझियाबादचा मलय केडिया आणि इंदोरच्या अथर्व महाजन यांनी रौप्य पदक जिंकल्याची माहिती मुंबईच्या होमी भाभा विज्ञान शिक्षण  केंद्रानं दिली.

आंतरराष्ट्रीय खगोल शास्त्र आणि खगोल भौतिक ऑलिम्पियाड ही जगभरातल्या उच्च-माध्यमिक शालेय विद्यार्थ्यांसाठी आयोजित केली जाणारी वार्षिक स्पर्धा असून, खगोल शास्त्र आणि खगोल भौतिक शास्त्राची आवड निर्माण करणं हा यामागचा उद्देश आहे.  यंदाच्या स्पर्धेत ४८ देशांमधले विद्यार्थी सहभागी झाले होते.