जिल्हाधिकारी कार्यालयात सामुहिक राष्ट्रगीत गायन

 


पुणे : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त ‘स्वराज्य महोत्सवाचे’ आयोजन करण्यात आले असून या महोत्सवाअंतर्गत जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात सामूहिक राष्ट्रगीत गायन करण्यात आले.

यावेळी अपर जिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, सुभाष भागडे, श्रीमंत पाटोळे, रोहिणी आखाडे, स्नेहल भोसले, राणी ताठे, सुरेखा माने तसेच संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी एस. व्ही. युनियन विद्यालय, सोमवार पेठ येथील विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीताचे गायन केले.

विभागीय आयुक्त कार्यालयात सामुहिक राष्ट्रगीत गायन

पुणे : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त ‘स्वराज्य महोत्सवाचे’ आयोजन करण्यात आले असून या महोत्सवाअंतर्गत अतिरिक्त विभागीय आयुक्त डॉ. अनिल रामोड यांच्या उपस्थितीत विभागीय आयुक्त कार्यालयात सामूहिक राष्ट्रगीत गायन करण्यात आले. यावेळी उपआयुक्त वर्षा लड्डा-उंटवाल, नयना बोन्दर्डे, नंदिनी आवडे तसेच संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.