राष्ट्रीय तपास संस्थेकडून दाऊद टोळीच्या साथीदाराला अटक

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय तपास संस्थेनं दाऊद टोळीच्या साथीदाराला अटक केली आहे. मोहम्मद इक्बाल क्युरेशी उर्फ सलीम फ्रुट असं या आरोपीचं नाव असून तो दाऊदचा जवळचा साथीदार आहे.

तस्करी, मनी लाँड्रिंग, बनावट नोटा चलनात आणणे, दहशतवादी कारवायांसाठी निधी उभारणं आणि एलईटी, जेएम आणि अल कायदासोबत काम करण्याच्या गुन्ह्याखाली त्याला अटक करण्यात आली आहे. डी कंपनीच्या दहशतवादी कारवायांसाठी पैसा उभारणं तसंच मालमत्ता व्यवहाराद्वारे छोटा शकीलच्या नावावर मोठ्या प्रमाणात पैसे उकळण्यात त्याचा सहभाग होता.