मुंबई (वृत्तसंस्था) : बैलपोळ्याचा सण आज साजरा होत आहे. वर्षभर शेतात शेतकऱ्यासमवेत बरोबरीने राबणाऱ्या बैलाप्रती एक दिवस उतराई होण्याची संधी म्हणून आपल्या सर्जाराजाचा पोळा हा सण शेतकरी बांधव श्रावण अमावस्येला अर्थात पिठोरी अमावस्येला अत्यंत आनंदाने आणि उत्साहाने साजरा करतात.
बैला सारखेच कष्ट करून आपल्या मालकाला आर्थिक हातभार लावणाऱ्या गाढवांचा सुद्धा पोळा भरवण्यात येतो. ही परंपरा अमरावती जिल्ह्यात अचलपुर तालुक्यातल्या रासेगाव इथं अनेक वर्षापासून पाळली जाते.
बैलांसोबत गाढवाचा पोळा, हे ऐकतांना नवल वाटतंय ना मात्र हो हे खरं आहे अमरावती जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यात असणारं रासेगावामध्ये गाढवांचा पोळा भरविला जातो. या दिवशी ज्याप्रमाणे बैलांचा साज शृंगार केला जातो त्याचप्रमाणे गाढवांचा सुद्धा साजशृंगार करून गाढवांना पुरणपोळी कुरडया पापड भजे यांसारखे स्वादिष्ट पदार्थ दिल्या जातात. एवढंच नाही तर बैलांप्रमाणे आजच्या दिवशी या गावातील गाढवांना कोणतेही काम करवून घेतल्या जात नाही. १३ किमी असणार्या रासेगाव येथे वास्तव्यास असणारे माहोरे परिवार मागील पंचवीस वर्षांपासून भूतदया दाखवत गाढवांचा पोळा करतात. या कामामध्ये श्याम माहुरे व त्यांची आई सरस्वती माहुरे यासुद्धा गाढवांच्या साजशृंगार करून त्यांना पुरणपोळी भरविण्यासाठी मदत करतात. श्याम माहुरे यांच्याकडे जवळपास दहा ते पंधरा गाढव आहेत. त्यांनी सांगितल्याप्रमाणे जवळपास त्यांच्या वडिलोपार्जित पंचवीस वर्षांपासून हा सण साजरा होत आहे. तर यातून शेतकरी बांधवांसाठी राबराब राबणाऱ्या बैल असो किंवा राबणारा गाढव असो हे दोघेही एकच. मेहनत करणार्या प्राण्यांची दया करा भूतदया दाखवा हाच संदेश या गावातून माहोरे कुटूंब दाखवीतांना दिसत आहेत.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.