गुंतवणूकदारांच्या सुविधेसाठी सेबीची स्थायी समिती स्थापन

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय प्रतीभूती आणि विनिमय मंडळ अर्थात SEBI ने विदेशी गुंतवणूकदारांच्या सुविधेसाठी एक स्थायी समिती स्थापन केली आहे. केंद्र सरकारचे माजी मुख्य आर्थिक सल्लागार के.व्ही. सुब्रमण्यम हे या समितीचे अध्यक्ष असतील. 

विदेशी गुंतवणूकदारांच्या व्यवसायात सुलभता आणण्यासाठी आणि भारतीय वित्तीय बाजारातील त्यांची गुंतवणूक आणि कृती संबंधित समस्यांबाबत ही समिती SEBI ला आपल्या शिफारसी आणि सल्ला देईल.