चीनमध्ये आढळला लांग्या नावाचा नवा विषाणू

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चीनमधल्या पूर्वेकडच्या दोन प्रांतामधे एक नवा प्राणिजन्य विषाणू आढळला आहे. हा हेनिपावायरसचा नवा प्रकार असून, त्याला लांग्या किंवा ले व्ही म्हटलं जातंय. चीनच्या शँडॉग आणि हेनन प्रांतात ३५ जणांना या विषाणूची लागण झाल्याचं वृत्त आहे. ताप, थकवा आणि खोकला इत्यादी लक्षणं अनेकांमधे आढळून आले आहेत. बाधितांमधे निकट संपर्काची पार्श्वभूमी नाही. प्राण्यांपासून माणसांमधे या विषाणूचे संक्रमण झालं असल्याचं अभ्यासातून स्पष्ट झालं आहे. मात्र या विषाणूमुळे घाबरुन जाण्याचं कारण नाही, असं संशोधकांनी सांगितलं.