इतर मागासवर्गीय- ओबीसी आरक्षणासंदर्भात ५ आठवडे स्थिती जैसे थे ठेवण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

 

मुंबई (वृत्तसंस्था) : नगरपालिका निवडणुकांमध्ये ओबीसी आरक्षण लागू करण्यासह अन्य संबंधित याचिकांवर सुनावणी करताना आज सर्वोच्च न्यायालयाने पाच आठवडे जैसे थे स्थिती ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानपरिषदेत दिली. याचा आदेश अद्याप हाती आलेला नाही मात्र वकिलांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सरन्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील पीठाने ओबीसी आरक्षणासंदर्भात जैसे थे स्थिती ठेवत असताना यासंदर्भातील राज्य सरकारच्या अध्यादेशाला कोणतीही स्थगिती दिलेली नाही असं फडणवीस यांनी स्पष्ट केलं.