पिच ब्लॅक 2022 युद्ध सरावामध्ये सहभागी होण्यासाठी भारतीय हवाई दलाची तुकडी ऑस्ट्रेलियाला

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पिच ब्लॅक 2022 युद्ध सरावामध्ये सहभागी होण्यासाठी भारतीय हवाई दलाची तुकडी ऑस्ट्रेलियाला पोहोचली आहे. आठ सप्टेंबरपर्यंत हा युद्ध सराव होणार आहे. ऑस्ट्रेलियाच्या वायुसेनेनं आयोजित केलेल्या या बहु-राष्ट्रीय सरावात शंभरहून अधिक विमानं आणि दोन हजार 500 लष्करी सैन्य सहभागी होणार आहेत.

भारतीय हवाई दलाच्या तुकडीमध्ये 100 हून अधिक हवाई योद्धे सहभागी असून चार Su-30 MKI आणि दोन C-17 लढाऊ विमानं देखील या युद्ध सरावात सहभागी होत आहेत.