बुद्धिबळ ऑलिंपियाड रिले मशाल पोहोचली अंदमान निकोबारमधल्या पोर्ट ब्लेअर इथं

 


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बुद्धिबळ ऑलिंपियाड रिले मशाल आज अंदमान निकोबारमधल्या पोर्ट ब्लेअर इथं पोहोचली. अंदमानच्या सेल्युलर कारागृहात आयोजित समारंभात ग्रँड मास्टर नीलोत्पल दास यांनी अंदमान-निकोबार प्रशासनाचे प्रधान सचिव जितेंद्र नारायण यांच्याकडे मशाल सुपूर्द केली. त्यानंतर प्रधान सचिवांनी पुन्हा ग्रँड मास्टर नीलोत्पल दास आणि सुप्रसिद्ध बुद्धिबळपटू  आर कस्तूरी भाई यांच्याकडे मशाल सुपूर्द केली. पोर्ट ब्लेअर इथल्या प्रमुख ठिकाणांना भेट दिल्यानंतर मशाल रिलेची अंदमान क्लबमध्ये सांगता झाली. अंदमान निकोबार द्वीप समूहात ११ बुद्धिबळ विद्यालयाची स्थापना करण्यात येणार असून या शाळांत शिकणारा प्रत्येक विद्यार्थी बुद्धिबळ हा विषय जादा पाठयक्रमाच्या स्वरूपात शिकणार असल्याचं प्रधान सचिवांनी यावेळी सांगितलं. मशाल रिले शेवटच्या टप्प्यात चेन्नईजवळच्या महाबलीपुरम इथं पोहोचवण्यात येणार आहे. यावर्षी देशात बुद्धिबळ ऑलींपियाड पहिल्यांदा २८ जुलै ते १० ऑगस्ट या कालावधीत आयोजित केलं जाणार आहे.