मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला विशेष वागणूक नको - एकनाथ शिंदे

 


मुंबई (वृत्तसंस्था) : मुख्यमंत्र्यांच्या वाहनांचा ताफा प्रवास करत असताना प्रवास मार्गावरची वाहतूक रोखून ठेवली जाते, यामुळे वाहतुकीचा खोळंबा होत असल्यानं मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला विशेष वागणूक नको असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. यापुढं मुख्यमंत्र्यांच्या प्रवास मार्गावरचा पोलीस बंदोबस्त कमी करुन, वाहनं अडवली जाणार नाही याची खबरदारी घेण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.