अत्यावश्यक आरोग्य सेवा स्थगिती आदेशातून वगळण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

 

मुंबई (वृत्तसंस्था) : आरोग्य सेवा अत्यावश्यक सेवा असून, रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्ये विभाग तसंच सार्वजनिक आरोग्य विभागाकडून खरेदी करावयाची औषधं, सर्जिकल्स साहित्य, उपभोग्य वस्तू, रसायनं आणि उपकरणांना स्थगितीच्या आदेशातून वगळण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल दिले आहेत.

कोविड महामारीमुळे आरोग्य यंत्रणेवरील वाढता ताण लक्षात घेता. तसंच सध्या सुरु असलेल्या पावसाळ्यात संसर्गजन्य आजार, साथीचे रोग पसरण्याची शक्यता यामुळे राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालये आणि रुग्णालयांमध्ये पायाभूत सुविधा निर्माण करण्यात आलेल्या आहेत.