राहुरी येथे लष्करामध्ये अग्नीवीर भरतीसाठी मेळावा

 

पुणे : भारतीय लष्करामध्ये अग्नीपथ योजनेंतर्गत अग्नीवर भरतीसाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, जि. अहमदनगर येथे २३ ऑगस्ट ते ११ सप्टेंबर २०२२ दरम्यान पुण्यासह सहा जिल्ह्यातील उमेदवारांसाठी अग्नीवीर भरती मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

अग्नीवीर जनरल ड्युटी, अग्नीवीर टेक्निकल, अग्नीवीर क्लर्क/स्टोअरकीपर आणि अग्नीवीर ट्रेड्समन या पदांसाठी ही भरती होणार आहे. पुणे, अहमदनगर, लातूर, उस्मानाबाद, बीड आणि सोलापूर जिल्ह्यातील उमेदवार या भरती मेळाव्यात भाग घेऊ शकतील. त्यासाठी https://joinindianarmy.nic.in या संकेतस्थळावर नोंदणी करावी लागेल. याच संकेतस्थळावर भरतीप्रक्रियेबाबत अधिक माहिती उपलब्ध आहे. या भरती मेळाव्यासाठी ऑनलाईन नोंदणी ३० जुलैपर्यंत सुरू राहणार आहे.

भरती प्रकियेसंदर्भातील अधिक माहिती https://joinindianarmy.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आली आहे, अशी माहिती भरती कार्यालय, मुख्यालय रिक्रुटिंग झोन, पुणेचे संचालक मेजर येसू राजू के यांनी दिली आहे.

Popular posts
विधानभवनाच्या प्रवेशद्वारावरच्या पायऱ्यांवर आंदोलन करायला, आणि प्रसारमाध्यमांनी तिथे चित्रीकरण करायला बंदी घालावी - जयंत पाटील
Image
देशव्यापी लसीकरण मोहिमेत आतापर्यंत कोविड प्रतिबंधक लशींच्या 122 कोटींचा टप्पा ओंलाडला
Image
महाराष्ट्र वस्तू आणि सेवा कर सुधारणा विधेयकाला विधानसभेत मंजुरी
Image
राज्यात आतापर्यंत ६४ लाख ५६ हजार ९३९ जणांना कोरोनाची लागण
Image
शेतकऱ्यांच्या जीवनात बदल घडवून आणण्यासाठी कृषी व्यवस्थापन अभ्यासक्रमाच्या पदवीधरांनी काम करावं- केंद्रीय कृषीमंत्री
Image