नीरज चोप्रानं केली डायमंड लीग स्पर्धेत रौप्यपदकाची कमाई

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ऑलिम्पिक सुवर्णपदकविजेत्या भालाफेकपटू नीरज चोप्रानं स्टॉकहोम इथं प्रतिष्ठित डायमंड लीग स्पर्धेत काल रौप्यपदकाची कमाई केली. त्याचबरोबर एका महिन्यात त्यानं स्वतःचाच राष्ट्रीय विक्रम दोनवेळा मोडीत काढला. नीरज चोप्रानं पाव्हो नुर्मी स्पर्धेत नोंदवलेला ८९ पूर्णांक ३० शतांश मीटरचा राष्ट्रीय विक्रम या स्पर्धेत मोडून नव्या विक्रमाला गवसणी घातली.