१८ वर्षा वरील सर्व नागरिकांना कोविड १९ ची वर्धक मात्रा विनामूल्य

 


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : १८ वर्षा वरील सर्व नागरिकांना कोविड १९ ची वर्धक मात्रा उद्यापासून पुढच्या ७५ दिवसांपर्यंत विनामूल्य दिली जाणार आहे. केंद्रीय मंत्रीमंडळाच्या काल झालेल्या बैठकीत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त हा निर्णय घेण्यात आला. माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी काल नवी दिल्ली इथं बातमीदारांना ही माहिती दिली. या केंद्राच्या निर्णयाला राज्याचा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाठिंबा दिला असून, हे अभियान परिणामकारकतेनं राबवले जाईल, असं त्यांनी आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर बातमीदारांना सांगितलं. 

Popular posts
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image