फाय-जी स्पेक्ट्रमसाठीच्या लिलावाला आजपासून सुरुवात
• महेश आनंदा लोंढे
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ५ जी स्पेक्ट्रमसाठीच्या लिलावाला आजपासून सुरुवात झाली. ७२ हजार मेगाहर्टझचे स्पेक्ट्रम याद्वारे २० वर्षांसाठी लिलावात उपलब्ध आहेत. यातून यशस्वी होणारे बोलीदार सर्वसामान्य नागरिक आणि व्यावसायिकांना ५ जी सेवा पुरवू शकतील.
लघू, मध्यम आणि उच्च फ्रिक्वेन्सी बँडसाठी हा लिलाव सुरू आहे. यातून उपलब्ध होणाऱ्या स्पेक्ट्रमच्या माध्यमातून दूरसंचार पुरवठादार ५ जी सेवा पुरवतील. यातून मिळणारा इंटरनेट स्पीड सध्याच्या ४ जी सेवेपेक्षा १० पट अधिक असेल, असा दावा आहे.
५ जी सेवेमुळं नवीन उद्योग व्यवसाय सुरू व्हायला मदत होईल तसंच सध्याच्या उद्योगांना व्यवसाय विस्तार करता येईल आणि रोजगारनिर्मितीमध्ये वाढ होईल.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.