महाराष्ट्रातून गुजरातला जाणारा ४३ लाखांचा मद्यसाठा जप्त

 

मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रातून अवैधरित्या गुजरातला जात असलेला तब्बल ४३ लाखांचा मद्यसाठा नंदुरबारच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं जप्त केला आहे. सुरत राष्ट्रीय महामार्गावर या कंटेनरची तपासणी करण्यात आली. या कंटेनरमधल्या विदेशी बनावटीच्या दारुची वाहतूक मध्यप्रदेशहुन गुजरातला होत असल्याची माहिती समोर आली आहे. कंटेनरचा चालक आणि  सहचालक घटनास्थळावरून फरार झाले. पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.